छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) ः शहरातील दोनवेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. या बाबत मुकुंदवाडी पोलिस स्टेशन तसेच जवाहरनगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या घटनेमध्ये काल सकाळी ९. ३० वाजेच्या सुमारास फिर्यादीची पत्नी ही कामानिमीत्त बाहेरगावी गेल्या होत्या. या वेळी फिर्यादीच्या दुसर्या मुलीच्या शाळेची सहल जाणार असल्याने तीला शाळेमध्ये सोडण्यासाठी गेले होते.तीला शाळेत सोडून घरी आले यानंतर ते अंघोळीसाठी गेले, नंतर ते आले असता घरात असणारी अल्पवयीन मुलगी ही घरी आढळून आली नाही. यानंत फिर्यादीने या मुलीचीआजुबाजुला, मैत्रिणीकडे चौकशी करुन शोध घेतला. परंतु ही मुलगी आढळून आली नसल्याने मुकुंदवाडी पोलिसस्टेशन येथे मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. तर दुसर्या घटनेत जवाहरनगर पोलिस स्टेशन परिसरात एक अल्पवयीन मुलगी घरामध्ये कोणालाही काहीही न सांगता घरातून निधून गेली. तिचा आजुबाजुला, बसस्थानक,नातेवायीकांच्या घरी देखील पाहणी केली. परंतु तेथेही ही अल्पवयीन मुलगी आढळली नाही. या बाबत अपहरण झाल्याची फिर्याद देण्यात आली असून जवाहर नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.











